आता रथातून स्वच्छतेबाबत जनजागृती

नागपूर : स्वच्छता रथाला हिरवी झेंडी दाखविताना स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, शेजारी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणे, आरोग्य अधिकारी स्वच्छता डॉ. सुनील कांबळे व इतर.
नागपूर : स्वच्छता रथाला हिरवी झेंडी दाखविताना स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, शेजारी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, नगरसेवक रमेश पुणेकर, नितीन साठवणे, आरोग्य अधिकारी स्वच्छता डॉ. सुनील कांबळे व इतर.

नागपूर : विविध उपक्रमातून जनजागृतीनंतरही नागरिकांनी कचरा वर्गीकरण तसेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. आता महापालिका स्वच्छता रथ शहरातील वस्त्यांमध्ये फिरविणार असून यातून जनजागृती करणार आहे. कचरा वर्गीकरणाचे धडे देतानाच ते न केल्यास दंडाबाबत माहिती देऊन नागरिकांकडून स्वच्छता करून घेणार आहे.
शहरातील प्रत्येक भागामध्ये नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण व्हावी, त्यांच्याकडून स्वच्छतेच्या नियमांचे पालन केले जावे याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता रथ तयार करण्यात आले आहे. सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मनपातून स्वच्छता रथाला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी नगरसेवक रमेश पुणेकर, नगरसेवक नितीन साठवणे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, जनजागृती रथ निर्मिती करणाऱ्या साई सेल्सचे इकबाल सिंग, मनमोहन सिंग, नंदकिशोर शेंडे, गजानन जाधव, नितेश मेश्राम आदी उपस्थित होते. शहरातील घरे, हॉटेल्स, दवाखाने यामधून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निघतो. मात्र, या कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण केले जात नाही. तसेच शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छतेबाबतचे नियमही पाळले जात नाही. याबाबत शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी मनपातर्फे स्वच्छता रथच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे. स्वच्छता रथद्वारे स्वच्छतेबाबत घ्यावयाची काळजी, घनकचऱ्याची योग्य विल्हेवाट, कचऱ्याचे योग्य संकलन, शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छतेबाबतचे नियम न पाळल्यास आकारावयाचा दंड याबाबत जनजागृती केली जात आहे. याशिवाय ध्वनिफीतद्वारे जनजागृती संदेश देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com