वणी : कुऱ्हाडीने अजगराला ठार केले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

वणी (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील मंदार येथे मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण नसताना केवळ भीतीतून एका अजगराचा कुऱ्हाडीने बळी घेतला गेला. मंदार येथील एका शेतात काही युवकांनी अजगराला बघितले. अजगर आपल्याला काही नुकसान पोहोचवेल, या भीतीतून त्यांनी लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने अजगराला ठार केले. एवढेच नाही तर या नागरिकांनी अजगराला मारहाण करतानाचे चित्रिकरण करून व्हिडीओ व्हायरल केले. परंतु अजगर बिनविषारी साप आहे. भारतात त्याने माणसाला काही नुकसान पोहोचविल्याचेही फारसे ऐकिवात नाही. वाघ, काळवीट असो की अन्य वन्यजीवांना ठार करणे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा अनुसूची एकमध्ये मोडतो.

वणी (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील मंदार येथे मानव-वन्यजीव संघर्षाचे कारण नसताना केवळ भीतीतून एका अजगराचा कुऱ्हाडीने बळी घेतला गेला. मंदार येथील एका शेतात काही युवकांनी अजगराला बघितले. अजगर आपल्याला काही नुकसान पोहोचवेल, या भीतीतून त्यांनी लाठ्याकाठ्या व कुऱ्हाडीने अजगराला ठार केले. एवढेच नाही तर या नागरिकांनी अजगराला मारहाण करतानाचे चित्रिकरण करून व्हिडीओ व्हायरल केले. परंतु अजगर बिनविषारी साप आहे. भारतात त्याने माणसाला काही नुकसान पोहोचविल्याचेही फारसे ऐकिवात नाही. वाघ, काळवीट असो की अन्य वन्यजीवांना ठार करणे कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हा अनुसूची एकमध्ये मोडतो. तसेच वन्यप्राणी संरक्षण कायदा 1969 प्रमाणे यात सात वर्षांची शिक्षाही होऊ शकते. शिवाय हा गुन्हा अजामीनपात्र आहे. वन्यप्राण्यांना नुकसान पोहोचवणे कायद्याने गुन्हा असून यासंदर्भात वनविभागाला तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे अजगराला ठार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोषींना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी एमएच 29 हेल्पिंग हॅण्ड्‌स वाइल्ड ऍडव्हेंचर आणि नेचर क्‍लब यवतमाळचे सदस्य सुरेश देशभ्रतार, नीलेश मेश्राम, सूरज खोब्रागडे, हरीश कापसे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ax killed the paython