बाळंतिणीच्या हाती देणार "बेबी किट'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर - तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी व भोजन देणारी योजना सुरू करतानाच प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात बाळंतिणीच्या हाती "बेबी किट' द्यावी यासंदर्भातील वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले होते. राज्य सरकारने शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना "बेबी किट' उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळात 11 डिसेंबरला घेतला आहे. 

संबंधित वृत्त - 
12 हजार मातांचे बाळंतपण घरीच 

वर्धा जिल्ह्यातील साहूर, गोंदिया जिल्ह्यातील आदिवासीबहुल अशा कोरंभी-टोला व भंडारा जिल्ह्यातील दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतिणीच्या हाती ही किट देण्यात येत होती. या योजनेला कुणाकडूनही दाद मिळत होती. "सकाळ'ने 16 जानेवारी 2018 रोजी यावर वृत्त प्रकाशित केले होते. राज्यभरात बाळंतिणीच्या हाती ही किट उपलब्ध करून दिल्यास गरीब महिलांना मदत होईल. संसर्ग होणार नाही असे साहित्य बेबी किटमधून दिल्यास बालमृत्यू रोखता येतील, असेही वृत्त प्रकाशित केले होते. तमिळनाडूच्या धर्तीवर "अम्मा शिशू केअर किट..' बाळंतिणीच्या हाती द्यावी यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी "अम्मा किट' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली होती. हे वृत्तदेखील "सकाळ'ने प्रकाशित केले होते. याशिवाय शिवसेनेचे नागपूर विभागाचे संपर्कप्रमुख चंद्रहास राऊत यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना मागणीचे निवेदन दिले होते. "सकाळ'च्या वृत्तानंतर महाराष्ट्र सरकारने उशिरा का होईना "बेबी किट' देण्याचा निर्णय घेतला आहे. 

अशी असेल किट 
दोन हजारांच्या किटमध्ये लहान मुलांचे कपडे, प्लॅस्टिक लंगोट व लहान चटई, झोपण्याची लहान गादी, टॉवेल, थर्मामीटर, अंगाला लावावयाचे तेल, मच्छरदाणी, ब्लॅंकेट, शॅम्पू, खेळणी-खुळखुळा, नखे काढण्यासाठी नेलकटर, हात व पाय मोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, मुलाला बांधून ठेवण्यासाठी कापड, आईसाठी लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्वीड आदी साहित्यांचा समावेश असेल. 

बेबी किटमुळे नवजात बालकांचे संसर्गापासून बचाव करता येईल. यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे शक्‍य होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या स्तुत्य निर्णयामुळे संस्थांमध्ये होणाऱ्या प्रसूतीची संख्या वाढेल. 
- डॉ. मनीष श्रीगिरीवार, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ.

Web Title: Baby kit to give pregnant lady decision in State Government Cabinet