सांगा कशी होणार अंगणवाडी स्मार्ट?

01anganwadi.jpg
01anganwadi.jpg

अकोला : रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, अंतर्गत भिंतींवर केलेली भित्ती सजावट, पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणाऱ्या दर्जेदार भौतिक सुविधा, मुलांना खेळण्यासाठी मैदान, बैठे खेळाचे विविध साहित्य असा ‘स्मार्ट साज’ असणाऱ्या 40 अंगणवाड्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उभ्या राहणार आहेत. परंतु त्यासाठी लागणारा निधीच उपलब्ध करुन न देण्यात आल्यामुळे अंगणवाड्या ‘स्मार्ट’ होण्यापासून दूर आहेत.

अंगणवाडी हे ग्रामस्तरावरावरील समाज विकासाचे प्रभावी केंद्र बनू शकते. अंगणवाड्याना भौतिकदृष्ट्या अद्यावत केल्याने शैक्षणिक वातावरण निर्मिती, बालकांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातील 40 अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या एक हजार 390 अंगणवाड्यांपैकी 40 अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येणार आहेत. 

निधीचा खोडा
विभागाच्या आठ प्रकल्पातून प्रत्येकी 5-5 अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. परंतु प्रस्तावित स्मार्ट अंगणवाड्यांना निधी उपलब्ध करुन देण्यात यंत्रणा दिरंगाई करत असल्यामुळे अंगणवाड्या ‘स्मार्ट’ होण्यापासून दूर आहेत.

अशी असेल स्मार्ट अंगणवाडी
अंगणवाड्यांमध्ये वॉटर प्युरीफायर, सिलींग फॅन, धान्य कोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा, ई-लर्निंग साहित्य, अंगणवाडी अंतर्गत व बाह्य रंगकाम, बोलक्या भिंती, छत दुरूस्ती, भिंतीची दुरूस्ती व डागडूजी, दरवाजा व खिडक्या दुरूस्ती, लायब्ररी रॅक आदी सुविधा देण्यात येतील.

निधी मिळताच कार्यवाही
जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्पातून पाच याप्रमाणे आठ प्रकल्पातील 40 अंगणवाड्या स्मार्ट करण्यात येतील. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- विलास का. मरसाळे
महिला व बाल कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद, अकोला 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com