#Republic Day 2020 : तिरंग्याच्या खाली एकवटण्याची गरज : बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व महापुरुषांचे त्यांनी स्मरण करीत एक जिल्हा तिरंग्याच्या म्हणून या जिल्ह्याची ओळख आगामी काळात पुढे येईल असे पालकमंत्री बच्चू कडू म्हणाले.

अकोला :  अकोला जिल्ह्याची ओळख तिरंग्याचा जिल्हा म्हणून आगामी काळात पुढे येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून, आज प्रत्येकाच्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी येथे केले.

महत्त्वाची बातमी - बच्चू कडू इन ॲक्शन, अधिकाऱ्यांवर कारवाईचा धडाका

स्थानिक शास्त्री मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्याहस्ते रविवारी (ता.26)  ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार गोपिकीशन बाजोरिया, महापौर अर्चना मसने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभा भोजने, महापालिकेचे आयुक्त संजय कापडणीस, पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, सीईओ विनय गोहाड, निवासी उयोजिल्हाधिकारी संजय खडसे, आरोग्य उपसंचालक, डॉ.रियाज फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Image may contain: 5 people, people standing and outdoor

 

हेही वाचा - गुणवत्ता सेवा पदकाने होणार पोलिसांचा सन्मान

प्राणाची आहुती देणाऱ्या महापुरुषांचे स्मरण
प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना पालकमंत्री बच्चू कडू यांनी शुभेच्छा देताना म्हणाले की, भारतीय संविधानामुळे आजचा दिवस आम्हाला पाहायला मिळाला. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व महापुरुषांचे त्यांनी स्मरण करीत एक जिल्हा तिरंग्याच्या म्हणून या जिल्ह्याची ओळख आगामी काळात पुढे येईल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद करीत तिरंगी झेंड्याचा खाली आता एकवटण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजनांच्या प्रगतीचा आलेखही त्यांनी सांगितला.

पालकमंत्र्यांची राहुटी उपक्रम सुरू करणार
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांची राहुटी हा उपक्रम सुरू करणार असल्याचेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bacchu kadu in republic day celebration