आमदार बच्चू कडू यांना कर्जवसुलीची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

अमरावती : शेतकऱ्यांसह अपंगांच्या प्रश्‍नांवर लढा देणाऱ्या अचलपूर मतदारसंघाचे आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्यावर जमीन जप्तीची नोटीस बॅंकेने बजावली आहे. 25 लाख रुपये कर्ज व त्यावरील व्याजासाठी बॅंकेने त्यांच्यासह पत्नी व जामीनदारास नोटीस बजावली. कर्जवसुलीसाठी नोटीस बजावण्यात आलेले ते राज्यातील कदाचित पहिले आमदार असावे.

अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी जनता सहकारी बॅंकेकडून कर्ज घेतले. शिरजगावबंड येथील मौजे प्रल्हादपूर सर्वे नं. 2-2 प्लॉट नं 1 या 321.56 चौरस मीटर भूखंडावर बांधकामासाठी कर्ज घेतले. मात्र, त्याचा नियमित भरणा केला नाही. आमदार कडू स्वतः मूळ कर्जदार असून नयना पंडितराव मोहोड (सहचारिणी) सहकर्जदार आहेत. विपिन लिल्हार हे या प्रकरणात जामीनदार आहेत. कर्ज न भरल्यामुळे जनता सहकारी बॅंकेने वसुलीसाठी आमदारांना जप्ती नोटीस. 25 लाख 53 हजार 177 रुपये घेणे असून त्यावर 1 ऑक्‍टोबर 2017 पासून व्याज आकारण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावल्यापासून 60 दिवस मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास त्यांची जमीन जप्त करण्यात येईल, असेही नोटीशीत म्हटले आहे.
आमदार नॉट रिचेबल
बॅंकेच्या या कारवाईसंदर्भात आमदार बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल होता.

Web Title: bachhu kadu news