दानवेंचा पराभव हेच लक्ष्य : आमदार बच्चू कडू

File photo
File photo

अमरावती : शेतकऱ्यांबद्दल अपशब्द काढणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव करणे तसेच यवतमाळ-वाशीम मतदारसंघात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिला वैशाली येडे यांचा विजय हेच आपले लक्ष्य असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रावसाहेब दानवे यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा संकल्प आपण केला आहे. त्यानुसार, दानवेंना तुल्यबळ असलेल्या उमेदवाराला प्रहार पूर्ण समर्थन करणार असून, या मतदारसंघातून दानवेंचा पराभव करण्यासाठी आपण कंबर कसल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात सुरुवातीला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. आपणच ही निवडणूक लढणार, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर दोन महिने आम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून शांत राहिलो. मात्र, ऐनवेळी खोतकर यांनी दानवेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यासारखी भूमिका वठवून स्वतः माघार घेतली. या धामधुमीत आम्ही गाफिल राहिलो; मात्र दानवेंच्या पराभवासाठी आपण जोर लावणार असल्याचे ते म्हणाले. यवतमाळ मतदारसंघातून वैशाली येडे या शेतकरी कुटुंबातील महिलेला "प्रहार'ने उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com