देशातील पहिला काँक्रीटचा पूल मोजताेय ‘अखेरची घटका’

bridge
bridge

अकोला : देशातील पहिला काँक्रीटचा पूल म्हणून जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुलाची ओळख आहे. पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन व देशातील पहिला सिमेंट काँक्रेटचा पूल आता अखेरच्या घटका मोजत आहे. पूर्णा नदीतील पूरामुळे या पूलाला तडे गेले आहेत. अनेक राज्यांना जोडणाऱ्या गांधीग्राम येथील पुलाच्या पिल्लरचा भराव वाळू उपस्यामुळे निघून गेल्याने मोठ्या दूर्घटनेची शक्यता बळावली आहे.

देशातील पहिला काँक्रीटचा पूल म्हणून जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पुलाची ओळख आहे. पूर्णा नदीवरील इंग्रजकालीन व देशातील पहिला सिमेंट काँक्रेटचा पूल आता अखेरच्या घटका मोजत आहे. पूर्णा नदीला पूर आल्यामुळे या पूलाला तडे गेले आहेत. अनेक राज्यांना जोडणाऱ्या गांधीग्राम येथील पुलाच्या डागडूजीची साधी व्यवस्थाही केल्या जात नसल्याने मोठ्या दुर्घटनेची दाट शक्यता आहे. राजस्थान, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांना जोडणारा हा रस्ता आहे.

१९२७ चे बांधकाम
गांधीग्राम येथील पुलाचे १८ जुलै १९२७ रोजी लोकार्पण करण्यात आले होते. दिल्ली- हैदराबादसाठी सर्वात जलद मार्ग म्हणून या मार्गाचा नावलौकिक आहे. राज्य महामार्ग २०४ वर हा पूल असून, अकोट, दर्यापूर आदी भागातील वाहतुकीचा भार या रस्त्यावर आहे. आकोट- अकोला या रस्त्यावर आता वाहनांची वर्दळ वाढली आहे.

अपघाताची शक्यता
पूर्णा नदीवरील हा पूल अरुंद असून, खाली बसला आहे. प्रत्येकवर्षी पावसाळ्यात या पुलावरून वाहने काढणे जिकीरीचे ठरते. त्याला कठडेदेखील नसल्याने अपघात शक्यता आहे. येथे अनेकवेळा मोठे अपघात झाले. पावसाळ्यात या पुलाच्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीला खोळंबा तर होतोच अनेकदा पुराच्या विळख्यात वाहने सापडली आहेत.

दहा वर्षांआधीच संपली मुदत
या पुलाची उंची व रुंदी वाढविणे आवश्यक होती. मात्र, गोपालखेडवरून नवीन पूलाचा प्रस्ताव असल्यामुळे या पूलाकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या पुलाची मुदत संपून दहा वर्षांचा कालावधी गेला असला तरी याच पुलावरून अद्याप वाहतूक सुरू आहे.

अशी आहे रचना
गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर असलेल्या या पूलाची उंची ३५ फूट व रुंदी २० फूट तर लांबी २५५ फूट आहे. या पूलाला आठ गाळे असून प्रत्येक गाळा वीस फुटावर आहे. नदीच्या काठावर दोन्ही बाजूला पुलाच्या सुरक्षेसाठी कवच बसविले आहे.पूल मजबूत होण्यासाठी नदीवर खोलवर सिमेंट व लोखंडाचा वापर करून बांधकाम करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com