खेळाडूंना निकृष्ट जेवण!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जुलै 2019

नागपूर : मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुल परिसरातील क्रीडा प्रबोधिनीत निकृष्ट जेवण दिले जात असल्याचा आरोप खेळाडूंनी केला आहे. जेवणाबाबत नाराजी व्यक्‍त करताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली. यासंदर्भात खेळाडूंनी पोलिस ठाणे गाठून कैफियत मांडली.

येथील क्रीडा प्रबोधिनीत राज्यातील विविध जिल्ह्यांचे जवळपास 40 खेळाडू निवासी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना शासनातर्फे चहा, नाश्‍ता व जेवणासह इतर सोयी-सुविधा पुरविण्यात येतात. मात्र, येथील जेवण निकृष्ण दर्जाचे असल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. शिवाय जेवण वेळेवर दिले नसल्याचीही त्यांची तक्रार आहे. यासंदर्भात प्रबोधिनीचे प्रमुख सुभाष रेवतकर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केल्याचा तसेच एका खेळाडूला मारहाण केल्याचा त्यांचा आरोप आहे. अलीकडच्या काळात अशा घटना वारंवार घडल्यामुळे अखेर कंटाळून प्रबोधिनीतील खेळाडूंनी सायंकाळी मानकापूर पोलिस ठाणे गाठून अधिकाऱ्यांविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी खेळाडूंची तक्रार नोंदवून घेतली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bad food to the players!