विकृत युवकाचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

नागपूर - एकांताचा फायदा घेऊन तेरा वर्षीय मुलीशी कुकर्म करणाऱ्या विकृत युवकाचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. शैलेश भोलराज यादव (वय २५, रा. नीरी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता. ८) जिल्हा न्यायाधीश दास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

नागपूर - एकांताचा फायदा घेऊन तेरा वर्षीय मुलीशी कुकर्म करणाऱ्या विकृत युवकाचा जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला. शैलेश भोलराज यादव (वय २५, रा. नीरी कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी (ता. ८) जिल्हा न्यायाधीश दास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

घटनेच्या दिवशी शैलेश पीडित मुलीच्या घरासमोरील कंपाउंडजवळ आला. त्यावेळी पीडित मुलगी, तिची बहीण आणि आजी असे तिघेच घरी होते. घराच्या कंपाउंडजवळ कुणीतरी उभे असल्याचे लक्षात आल्याने पीडित मुलगी विचारपूस करण्यासाठी जवळ आली. तिला आरोपीने ‘जांभुळे यांचे घर हेच का?’ अशी विचारणा केली. तसेच पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानुसार तिने पाणी आणून दिले असता आरोपीने त्याच्याजवळ असलेला चाकू दाखवीत तिला धमकावले. चाकूच्या बळावर त्याने पीडित मुलीला घरासमोर असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नेले. तिथे नेऊन विनयभंग केला. यादरम्यान मुलीने आरडाओरड केल्याने भीतीपोटी आरोपीने पळ काढला.

मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरुद्ध प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. यानुसार पोलिसांनी शैलेशवर भादंवि कलम ३५४ (अ) (ब), ४५२, ५०६ (ब) तसेच पोक्‍सो कायद्यातील सहकलम ७, ८ अंतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेत न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला. सरकारतर्फे सरकारी वकील माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली. 

एकट्या मुलींना गाठतो शैलेश 
एकट्या मुलींना गाठून त्यांच्याशी कुकर्म करण्याचा प्रयत्न शैलेशने यापूर्वी चारवेळा केला. त्याच्याविरुद्ध प्रतापनगर आणि गिट्टीखदान पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन गुन्ह्यांची नोंद आहे. चांगल्या भागातील वस्त्यांमध्ये दुपारच्या वेळी घरी कुणी नसल्याचा फायदा आरोपी घेत असल्याचे, पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: Bail distorted youth