पोलिसाच्या हत्येप्रकरणी चौघांचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

एका पोलिसाला नक्षलींच्या स्वाधीन करून त्याच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या 4 आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला. या आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोप निश्‍चित झाले असून, हा खटला 4 महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

नागपूर - एका पोलिसाला नक्षलींच्या स्वाधीन करून त्याच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या 4 आरोपींचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळला. या आरोपींविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोप निश्‍चित झाले असून, हा खटला 4 महिन्यांत निकाली काढण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पेका माडी पुंगाटी (वय 35), मधुकर रैनू धुर्वा (वय 26), रानू रैनू लेकामी (वय 24) व देऊ उलगे गोटा (वय 28) अशी आरोपींची नावे असून, ते भामरागड तालुक्‍यातील रहिवासी आहेत. मयत पोलिसाचे नाव बंडू घिसू वाचामी (वय 32) होते. ते कोठी येथील पोलिस मदत केंद्रात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी बबिता यांनी भामरागड पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीनुसार, वाचामी 10 मे 2016 रोजी घरून कार्यालयात जाण्यासाठी निघाल्यानंतर परत आले नाही. परिणामी 13 मे रोजी बबिता यांनी ते हलविल्याची तक्रार नोंदविली.

काही गावकऱ्यांनी वाचामी यांना पकडून नक्षलींच्या स्वाधीन केल्याची माहिती तपास करताना पुढे आली. दरम्यान, वाचामी यांचा मृतदेहही मिळून आला. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता संजय डोईफोडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Bail rejected in police murder case