बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली वाहनचालकाला मारहाण

वाहनचालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली
वाहनचालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली

तिवसा (जि. अमरावती) : जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून एका वाहनचालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. सोमवारी वाहनचालकाने या प्रकरणाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी बजरंग दलाच्या सहा कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
अमोल वसंत डाकोरे (वय 30,रा. अशोकनगर तिवसा) असे मारहाणीत जखमी झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे. रविवारी चांदूरबाजारला बैलबाजार भरतो. याच बाजारात रविवारी (15) सकाळी एमएच 27 एक्‍स 6325 व एमएच 27 एक्‍स 5037 या क्रमांकाच्या दोन टाटा एस या चारचाकी वाहनात बैल विक्रीसाठी नेत असताना तिवसा सातरगाव रोडवर तिवसा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहनचालक अमोल डाखोरे यांना अडविले. एमएच 27 एक्‍स 6325 या टाटाएस वाहनाच्या काचा फोडल्या व जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून त्यांच्या डोक्‍यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. पाठीवरसुद्धा मारहाण केली.
पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत त्यांच्या डोक्‍यावर पाणी टाकून त्यांना त्याच ठिकाणी टाकून पळ काढला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल न करण्याची धमकीसुद्धा दिली. भीतीपोटी वाहनचालकाने मारहाणीची बाब लपवली होती. मात्र, सोमवारी त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
एका शेतकऱ्याला गाडीचे भाडे परवडत नसल्याने आम्ही दोघे-तिघे मिळून आपली जनावरे विकण्यासाठी बाजारपेठेत घेऊन जात होतो. मात्र, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आमचा रस्ता अडविला व जबर मारहाण केली. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होण्याची शक्‍यता असून आमच्या जीवाला धोका असल्याचे अमोल डाखोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com