कृषी, महसूलविषयक कामांना गती द्या; महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे निर्देश

balasaheb thorat about farmers issue in yavatmal
balasaheb thorat about farmers issue in yavatmal

यवतमाळ : गेल्या सात महिन्यांपासून राज्य शासन, संपूर्ण प्रशासन कोरोनाविरुद्धची लढाई अग्रेसरपणे लढत आहे. असे असले तरी अर्थचक्राला गती देण्यासाठी शासनाने 'मिशन बिगीन अगेन'ची सुरुवात केली आहे. सामान्य माणसांचा दैनंदिन संपर्क महसूल व कृषी विभागांशी येतो. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महसूल आणि शेतीविषयक कामांना प्रशासनाने गती द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.

नियोजन सभागृहात आयोजित कोविड-19 व महसूल विषयक आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी महिला व बालविकासमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर, खासदार बाळू धानोरकर, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, संध्या सव्वालाखे, विदर्भ किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार आदी उपस्थित होते. 

थोरात म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना वेळेत मदत देण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. कर्जवाटपात 90 टक्‍के चांगले काम केले. मात्र, 10 टक्‍के काम झाले नाही, तर नाराजी वाढते. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नाराजी वाढणार नाही, या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.

सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी थंडी वाढल्यानंतर पुन्हा एकदा संसर्गाची शक्‍यता नाकारता येत नाही. राज्यमंत्रिमंडळात या विषयावर चर्चा झाली असून, सरकार याबाबत अतिशय गंभीर आहे. महसूल, आरोग्य व पोलिस प्रशासनाने कोरोनाच्या संकटात अतिशय चांगले काम केले आहे, अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली. सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवटे यांनी केले. उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी आभार मानले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com