बल्लारपूर : बल्लारपुरातून सुधीर मुनगंटीवार आघाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : बल्लारपूर मतदारसंघातून भाजपचे प्रमुख नेते सुधीर मुनगंटीवार आघाडीवर आहेत.

सुधीर मुनगंटीवार पहिल्या फेरीअखेर 900 मतांनी आघाडीवर आहेत. राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी येथील लढत सोपी ठरली आहे. त्यांच्या विरोधात कॉंग्रेसने राजकारणात नवखे डॉ. विश्‍वास झाडे यांना रिंगणात उतरले. वंचितचे राजू झोडे यांनीही प्रचारात मतदारांचा प्रतिसाद मिळविला. मुनगंटीवार विजयाबाबत आश्‍वस्त आहेत. मात्र, त्यांनाही मताधिक्‍याची चिंता लागली आहे. येथे 13 उमेदवार रिंगणात आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ballarpur vidhan sabha election result sudhir mungantiwar ahead