माती आणि जलपुनर्भरणाचा नैसर्गिक स्रोत ‘बांबू’!

मनोज भिवगडे
सोमवार, 21 मे 2018

अकोला : गवत वर्गीय झाड असलेल्या बांबू लागवडीतून नैसर्गिकरित्या जलपुनर्भरण व माती निर्मिती करता येते, असे निरिक्षण निवृत्त वनाधिकाऱ्यांनी त्यांच्या वनभ्रमंतीच्या कार्यकाळात नोंदविले आहे. हे बघता कायम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असलेल्या अकोला जिल्ह्यासाठी बांबू लागवड वरदान ठरू शकते.

भारतात 140 बांबू प्रजाती विविध राज्यांमध्ये अस्तित्वात आहेत. त्यापैकी 60 प्रजातींची लागवड केली जाते. बांबू लागवडीसाठी बारमाही पडिक ते कायमस्वरूपी सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीन जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. एका झाडाला चार बाय चार फुटाची जागा लागते. पूर्ण वाढीसाठी तीन वर्षांचा कार्यकाळ लागतो. त्यानंतर हे झाड जमीन सुपीक करण्यासोबत जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आश्‍चर्यजनक कार्य करीत असल्याचा दावा निवृत्त वनाधिकारी रमेशप्रसाद दुबे यांनी केला आहे. त्यांनी वनविभागातील त्यांच्या 35 वर्षांच्या कार्यकाळात वऱ्हाडातील सात तालुक्यांमध्ये काम करताना वेगवेगळ्या वातावरणात जमिनीची होत असलेली धूप आणि पाणीपातळीत झालेली घट यावर काही निरीक्षणं नोंदवून बांबू लागवडीची उपयुक्तता सिद्ध केली आहे.

Web Title: bamboo is natural resource for soil and for water refilling