"ग्लायफोसेट'वर कायमस्वरूपी बंदीच्या हालचाली

विनोद इंगोले
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर : आंध प्रदेशच्या धर्तीवर "ग्लायफोसेट'ला कीटनाशक परवान्यातूनच कायमस्वरूपी वगळण्याचा प्रस्ताव कृषी सचिवालयाने कृषी आयुक्‍तालयाकडे दिला आहे. गुणनिविष्ठा विभाग आयुक्‍तांकडे असल्याने सुनावणीअंती त्यांच्याद्वारे हे घातक तणनाशक परवान्यातून वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

नागपूर : आंध प्रदेशच्या धर्तीवर "ग्लायफोसेट'ला कीटनाशक परवान्यातूनच कायमस्वरूपी वगळण्याचा प्रस्ताव कृषी सचिवालयाने कृषी आयुक्‍तालयाकडे दिला आहे. गुणनिविष्ठा विभाग आयुक्‍तांकडे असल्याने सुनावणीअंती त्यांच्याद्वारे हे घातक तणनाशक परवान्यातून वगळण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
बांधावरील तणासाठी मोन्सॅटो कंपनी उत्पादित ग्लायफोसेट उपयोगात आणले जाते. याच कंपनीने तणाला प्रतिकारक जनुक असलेले एच.टी. (हर्बीसाइड टॉलरंज) कपाशी बियाणे बाजारात आणण्यासाठी परवानगीकरिता केंद्र सरकारकडे अर्ज केले. दरम्यान, चाचण्या सुरू असतानाच हा अर्ज कंपनीकडून मागे घेण्यात आला. परंतु, त्यानंतर अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर एच. टी. बियाणे देशभराच्या बाजारात दाखल झाले. अनधिकृत लागवड झालेल्या या कापूसक्षेत्रातील तणासाठी "ग्लायफोसेट'ही वापरले गेले. परंतु, चहा व्यतिरिक्‍त देशातील अन्य कोणत्याच पिकासाठी या तणनाशकाची शिफारस करण्यात आली नसल्याचे खुद्द कंपनीनेच कबूल केले आहे. असे असताना देशातील अनेक राज्यांच्या कीटनाशक परवान्यात मात्र "ग्लायफोसेट' या तणनाशकाचा समावेश आहे. त्यामुळे कंपनीकडून याचा पुरवठा आणि विक्रेत्यांकडून त्याची विक्री होत होती.
आंध्रप्रमाणेच बंदी घाला
अनधिकृत एच. टी. बियाण्यांचा वाढीस लागलेल्या वापरामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली. त्यापाठोपाठ "ग्लायफोसेट'चा वापरही वाढीस लागल्याचे निरीक्षण नोंदविले गेले. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील सर्वच राज्याच्या कृषी सचिवांची दिल्लीत बैठक घेतली. "ग्लायफोसेट' हे त्या-त्या राज्याच्या परवान्यात असल्याने बंदी राज्याच्या अखत्यारित येते. आंध प्रदेशने सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन यापूर्वीच "ग्लायफोसेट'ला परवान्यातून वगळून बंदी लादली. केंद्र सरकारने आंध्र प्रदेशच्या या कृतीचे समर्थन करून इतर राज्यांनीदेखील परवान्यातून हे तणनाशक वगळून त्यावर बंदीची कारवाई करावी, अशा सूचना केल्या.

Web Title: ban praposed on glayphosate