मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यात 'बंद'चे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

जिल्ह्यातील १००० तरुणांना थेट रोजगार, तर २००० तरुणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

गडचिरोली : महत्त्वाकांक्षी सुरजागड प्रकल्पातून निघालेल्या कच्च्या खनिजांवर आधारित स्टील प्लँटचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू असतानाच सुरजागड बचाओ समितीतर्फे आज एटापल्ली बंदचं आवाहन केलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी परिसरातील कोंनसरी गावाजवळ होणार स्टील प्लँट, लॉईड उद्योग ७०० कोटींची गुंतवणूक  करणार आहे. जिल्ह्यातील १००० तरुणांना थेट रोजगार, तर २००० तरुणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. १० मेगावॉट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प, १०० टन क्षमतेचा स्पाँज आयर्न प्रकल्प देखील उभारण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शुक्रवार) गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते सुरजागड लोह प्रकल्पातील कारखान्याचे भूमिपूजन करणार आहेत. त्याविरोधात जनहितवादी संघर्ष समिती तथा सुरजागड बचाओ समितीतर्फे आज एटापल्ली बंदचं आवाहन केलं आहे.
 

Web Title: bandh called during cm devendra fadnavis gadchiroli tour