मंत्र्यांसह आमदारांचेही बॅंक खाते तपासणार - रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

अकोला - नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्रातील मंत्री आणि खासदारांच्या बॅंक खात्यात झालेल्या व्यवहाराची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील मंत्री व आमदारांच्या बॅंक खात्यांचे अहवाल मागवून तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना दानवे म्हणाले की, भाजप सरकारने काळ्या पैश्‍याविरुद्ध छेडलेल्या लढाईचा भाग म्हणजे नोटबंदीचा निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या ऐतिसाहिक निर्णयावर जनता खूश आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा कारभार पारदर्शकपणे चालविण्यात येत आहे. नरेंद्र मोदींनी देशातील भाजपच्या सर्व मंत्री व खासदारांना नोटबंदीच्या निर्णयानंतर त्यांच्या खात्यात झालेल्या व्यवहाराची माहिती मागितली आहे. त्याच धर्तीवर राज्यातील मंत्री व आमदारांचे बॅंक खात्याचा अहवाल मागण्यात येणार आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यावर प्रसारमाध्यमे मोदींची लाट असल्याचे म्हणत होते. ही लाट आजही कायम आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनहिताचे निर्णय घेत असल्यानेच राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतसुद्धा भाजपच राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून विजयी होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात स्थानिक पातळीवर कोणतेही गटा-तटाचे राजकारण नाही. पश्‍चिम विदर्भात मिळालेले यश हे सर्वांनी एकदिलाने केलेल्या कामाचे फलित असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Web Title: bank account check Ministers with mla