दोन बॅंकांची ४८३ कोटींनी फसवणूक

Empress-Mall
Empress-Mall

नागपूर - दोन बॅंकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याने सक्तवसुली संचालनालयाने तायल समूहाच्या शहरातील एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. या मालमत्तेची किंमत ४८३ कोटी इतकी आहे. 

तायल समूहाच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. यात एम. एस. ॲक्‍टिफ कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स जयभारत टेक्‍सटाइल्स अँड रियल इस्टेट लिमिटेड आणि मेसर्स केकेटीएल यांचा समावेश आहे. मेसर्स केकेटीएल आणि एमएस या कंपनीने २००८ साली बॅंक ऑफ इंडिया आणि आंध्र बॅंकेकडून ५२४ कोटींचे कर्ज घेतले होते. मात्र, त्याची परतफेड केली नाही. त्यामुळे  दोन्ही बॅंकांनी कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याच्या आधारे सक्त वसुली संचालनालयाने तिन्ही कंपन्यांची तपासणी केली होती. आत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आढळून आला. मनी लाँड्रिंग कायद्याचेही उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सक्त वसुली संचालनालयाने नागपूरमधील ४८३ कोटी  बाजारभाव असलेल्या एसएस केएसएल अँड इंडस्ट्रीज लि. या कंपनीची मालमत्ता असलेला एम्प्रेस मॉलवर टाच आणली आहे. मनी लॅंडरिंग ॲक्‍टनुसार शॉपिंग मॉलसह दोन लाख ७० हजार ३७४ चौरस फुटाच्या जमिनीचाही यात समावेश आहे. यामुळे तायल ग्रुपला मोठा धक्का बसला आहे.

तायल ग्रुपने एम्प्रेस मिलची जागा खरेदी करून २००६ साली एम्प्रेस मॉलची निर्मिती केली होती. यात व्यावसायिक प्रतिष्ठाने, घरकुल योजना, आयटी पार्क आदींचा समावेश होता. 

मॉल उभारण्यात आला असून येथे बिग बाजार, पीव्हीआर मल्टिप्लेकसह अनेक ब्रँडेड कंपन्यांचे शोरूम आहेत. या मॉलमधील रहिवाशांनीसुद्धा ज्या सोयी सुविधा दिल्या जाणार होत्या दिल्या नसल्याचे सांगून 

एम्प्रेस मॉलवर ईडीची टाच
फसवणूक केल्याचा अनेकदा आरोप केला आहे. मालमत्ता करही थकविल्याने महापालिकेने नोटीस बजावली होती. मालमत्ता कर वसुलीसाठी मॉलसमोर मनपाच्या मालमत्ता कर विभागाने  बॅंड वाजविला होता. याविरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. याशिवाय बांधकाम करताना अग्निशमन विभागाच्या नियमांचेही उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com