बॅंक मॅनेजरचा युवतीवर बलात्कार; घरात कोंडून मारहाण

अनिल कांबळे
रविवार, 17 जून 2018

ती प्रितेशच्या घरी 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहू लागली. या दरम्यान त्याने तिच्याशी अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र लग्न करण्यास नकार देत तिला नागपुरात परत पाठवले.

नागपूर - बॅंक मॅनेजरने प्रेयसीला तीन महिने घरात कोंडून
बलात्कार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी प्रेयसीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रितेश परतेकी (वय 30, रा. बोरगाव, एकता नगर) असे आरोपी बॅंक मॅनेजरचे नाव आहे.

आरोपी प्रितेश हा तामिलनाडू येथे इंडियन बॅंकेत ब्रॅंच मॅनेजर आहे. तर
पीडित युवती अश्‍विनी (बदलेले नाव) ही उच्चशिक्षित असून वाडीत राहते.
तिचे वडील खासगी कंपनी नोकरीला आहेत. तिच्या नात्यात असलेल्या
प्रितेशसोबत ओळख झाली. नातेवाईक असल्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. दोघांचीही मैत्री-प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांचेही
जीवापाड प्रेम असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रितेश
हा तामिळनाडूला नोकरीवर निघून गेला. त्याने अश्‍विनीलाही तामिलनाडूला
येण्यास सांगितले. महिन्याभरानंतर आईवडीलांना नोकरी लागल्याचे सांगून
तामिलनाडूला निघून गेली. तेथे ती प्रितेशच्या घरी 'लिव्ह इन
रिलेशनशिप'मध्ये राहू लागली. या दरम्यान त्याने तिच्याशी अनेक वेळा
शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मात्र लग्न करण्यास नकार देत
तिला नागपुरात परत पाठवले. त्यामुळे अश्‍विनीने पोलिसांत बलात्कार
केल्याची तक्रार दिली.

नोकरी लागल्याचा बहाणा -
अश्‍विनीला तामिलनाडूत प्रियकराकडे राहायला जायचे होते. मात्र,
आईवडीलांना काय सांगायचे? असा प्रश्‍न पडला. तिने नोकरीच्या मुलाखतीसाठी तामिलनाडूत जात असल्याचे खोट सांगून तामिलनाडू गाठले. त्यानंतर तेथेच नाकरी लागल्याचे सांगितले. दोघेही तेथे पती-पत्नीप्रमाणे राहत होते.

आईवडील धडकले -
प्रितेशला न सांगता त्याचे आईवडील तामिलनाडूत धडकले. थेट रूमवर गेले असता तेथे अश्‍विनी दिसली. दोघांनही थातुरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेली. मात्र, त्याच्या आईने अश्‍विनीला चांगले खडे बोल सुनावले. त्यानंतर तिला नागपुरला परत पाठवले.

लग्नास नकार -
अश्‍विनीने घडलेला प्रकार आईवडीलांना सांगितला. तिच्या आईने प्रितेशच्या
आईवडीलांची भेट घेतली आणि लग्नाची बोलणी केली. मात्र, त्यांनी लग्नासाठी अश्‍विनीला थेट नकार दिला. 'अ' नावाच्या मुलींपासून प्रितेशच्या जीवाला धोका असल्याचे सांगत पुन्हा दारात पाय ठेवायचा नाही, अशी धमकी दिली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A Bank manager raped a young woman