धानोरा तालुक्‍यात नक्षल्यांची बॅनरबाजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

गडचिरोली  : नक्षलवाद्यांचा नक्षल सप्ताह रविवार (ता. 28)पासून प्रारंभ होत असून 3 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर नक्षल्यांनी बंदचे आवाहन केले असून धानोरा तालुक्‍यात अनेक ठिकाणी बॅनर बांधले आहेत.

धानोरा तालुका मुख्यालयापासून 3 किमी अंतरावर असलेल्या सालेभट्टी, वडगाव, जपतलाई येथे नक्षल्यांचे बॅनर आढळून आले आहेत. नक्षल्यांनी चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांच्या स्मरणार्थ बंदचे आवाहन केले आहे. बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे बॅनरवर नमूद केले आहे. सरकारविरोधी मजकूर लिहिण्यात आला आहे. बॅनरबाजीमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. धानोरा तालुक्‍यापासून अवघ्या एक किमी अंतरावर सालेभट्टी गावाजवळ कठाणी नदीच्या कठड्याला तर सालेभट्टीपासून दोन किमी अंतरावर वडगाव येथे दुसरे लाल रंगाचे कापडी बॅनर बांधलेले शनिवारी (ता. 27) सकाळी गावातील लोकांना आढळून आले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banking of artifacts in Dhanora taluka

टॅग्स