Fri, June 2, 2023

Gadchiroli News : मवेली पुलाजवळ आढळले नक्षलवाद्यांचे बॅनर
Published on : 16 March 2023, 2:01 pm
गडचिरोली : जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली- कसनसुर मार्गावरील पुलाजवळ गुरुवार (ता. १६) सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांचे बॅनर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. एटापल्ली-कसनसूर मार्गावरील मवेली नजीक असलेल्या पुलाजवळ लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष माओवादी यांनी लावलेल्या बॅनरमध्ये कसनसुर ते पीव्ही 86 रस्त्याचे काम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत रस्त्याचे काम करणाऱ्या कंट्राटदारालाही या बॅनरमधून रोड काम बंद केल्यास त्याचा परिणाम भोगण्याची तयारी ठेवा, अशा धमकीवजा आशयाचा इशारा या बॅनरमधून देण्यात आला आहे.