अमरावती कारागृहातून पळून जाण्याचा बंदीचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

अमरावती : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीने कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, कारागृहातील जवानांनी त्याचा पाठलाग करून काही वेळातच वडाळी परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या मुसक्‍या आवळल्या. आज, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

अकोला जिल्ह्यातील रहिवासी मोहन श्रीराम सोळंके (वय 27) याला खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जुलै 2014 पासून तो अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. तेव्हापासून त्याच्या वागणुकीमुळे त्याची खुल्या कारागृहासाठी नुकतीच निवड करण्यात आली. आज त्याला बाहेर काढून खुल्या कारागृहातील अन्य बंदींसोबत शेतीचे काम देण्यात आले. शेतीच्या कामासाठी बंदींचे चार गट करून त्यावर प्रत्येकी एक जवान लक्ष ठेवून होता. या वेळी मोहनने जवानाची नजर चुकवून तारेच्या कुंपणावरून उडी घेत कारागृहातून पलायन केले. त्यामुळे कारागृह प्रशासनात एकच तारांबळ उडाली. जवानांनी तातडीने मोहनचा पाठलाग केला. वडाळीच्या दिशेने पळत सुटलेल्या मोहनचा पाठलाग करीत जवानांनी राष्ट्रीय महामार्गावर त्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्यानंतर त्याला कारागृहात आणण्यात आले. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनाक्रमाला कारागृह अधीक्षक रमेश कांबळे यांनी दुजोरा दिला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban's attempt to escape from Amravati jail failed