युकाँच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नागपूर - भाजपच्या कार्यालयावर गंगाजल शिंपडण्यासाठी निघालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चिटणीसपार्कजवळच रोखले. याविरोधात रस्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 

नागपूर - भाजपच्या कार्यालयावर गंगाजल शिंपडण्यासाठी निघालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चिटणीसपार्कजवळच रोखले. याविरोधात रस्ता रोको आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. 

बलात्कार करणाऱ्या आमदाराचे समर्थन करणाऱ्या भाजपच्या मानसिकचे शुद्धीकरण करण्यासाठी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव नगरसेवक बंटी शेळकेच्या नेतृत्वात भाजप कार्यालयावर गंगाजल शिंपडण्याचे अभिनव आंदोलन करण्यात येणार होते. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्‌स लावले होते. तसेच जागोजागी पोलिसही तैनात केले होते. पाच वाजताच्या सुमारास देवडिया काँग्रेस भवन येथून कार्यकर्ते भाजपच्या कार्यालयाकडे निघाले. मात्र, त्यांना वाटेतच अडविले. बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. यामुळे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे लाठीमार करून त्यांना पांगविण्यात आले.

आंदोलनात लीगल सेलचे अध्यक्ष अक्षय समर्थ, महासचिव अभय रणदिवे, युवक काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष चारुदत्त वासाडे, युवक काँग्रेस सचिव अमेय पराते, बाबू खान, अक्षय घाटोळे, प्रणीत बिसने, मोईझ शेख, स्वप्नील ढोके, नावेद शेख, राजेंद्र ठाकरे, अलोक कोंडापूरवार, जावेद शेख, चक्रधर भोयर, सौरभ शेळके, वसीम शेख, नीलेश देशभ्रतार, रिझवान खान, शाहबाज खान, सुशांत सहारे, फजलूर कुरेशी, निखिल शेंडे, चेतन डाफ, मनीष हसोरिया, राज बोकडे, निखिल वांढरे, प्रज्ज्वल शनिवारे, विजय बारापत्रे, विजय मिश्रा, सोनू पोनिकर, प्रेम शीतलवार, आकाश माललेवार, नमन विलियम, अभिषेक महाकाळकर, प्रज्ज्वल ठाकरे, फरदिन खान, राहुल मोहोड, सागर चव्हाण, देवेंद्र तुमाने, हर्षल धुर्वे, पंकेश निमजे, सूरज थापा, शानू खान, समीर अहमद, अरमान मलीक, इम्रान पल्ला, शेख अझर, नकील अहमद, साजिद खान, माधव जुगेल, गजानन वर्मा, मंदार बांगडकर, राम शास्त्रकार, अभिषेक धोटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: banti shelake arrested crime police stick