बापरे! पथ्रोटच्या सेंट्रल बॅंकेतून 50 हजारांची रोकड लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 सप्टेंबर 2019

पथ्रोट (जि. अमरावती) : येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेमधून पन्नास हजाराची रोकड लंपास झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भाऊराव नाथे (रा. कुष्टा) असे रोकड लंपास झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.

पथ्रोट (जि. अमरावती) : येथील सेंट्रल बॅंकेच्या शाखेमधून पन्नास हजाराची रोकड लंपास झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. भाऊराव नाथे (रा. कुष्टा) असे रोकड लंपास झालेल्या ग्राहकाचे नाव आहे.
दैनंदिन व्यवहाराकरिता सेंट्रल बॅंकेच्या शाखेमध्ये दररोज गर्दी असते. शुक्रवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने परिसरातील खेडेगावच्या आदिवासी ग्राहकांचीसुद्धा मोठ्या संख्येने गर्दी होती. अशातच शुक्रवारी भाऊराव नाथे हे बॅंकेत दाखल झाले. त्यांनी पन्नास हजार रुपयांची रोकड बॅंकेतून काढली. ती समोरच्या काउंटरवर ठेवून पासबुक एन्ट्री करण्यासाठी दिले. बॅंकेच्या कर्मचाऱ्याशी बातचीत करण्यात ते व्यस्त असतानाच त्याचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने काऊंटरवरची पन्नास हजाराची रोकड लंपास केली. हा प्रकार लक्षात आल्यावर प्रचंड खळबळ उडाली. त्यांनी तत्काळ याबाबत बॅंक व्यवस्थापकांना माहिती दिली. बॅंक व्यवस्थापकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याच्यात एक तरुण रक्कम घेऊन जात असल्याचे आढळून आले. परंतु सध्या त्याची ओळख पटली नसल्याने त्याचा शोध घेणे सुरू आहे.
सीसीटीव्ही कॅमेरा तपासले असता रक्कम घेऊन जाताना एक तरुण दिसून येत आहे. त्याचा चेहरा जरी दिसला असला; तरी सध्या त्याची ओळख पटलेली नाही.
- श्‍याम डाळिंबकर,
व्यवस्थापक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bapre ! 50,000 cash lampas from Central Bank of pathrot