आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

अमरावती : आपल्या मित्रांसोबत नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना पूर्णानगरात घडली. अभिषेक श्‍यामराव तायडे (वय 18 रा. पूर्णानगर, आसेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांचे परिसरात हॉटेल आहे. सकाळी काही वेळ येथे काम केल्यानंतर तो आपल्या गावातील तीन ते चार मित्रांसोबत आंघोळीसाठी पूर्णानदी पात्रात गेला होता. सर्वच मित्रांनी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिषेक याने उडी घेताच गटांगळ्या खाल्ल्याने तो बुडाला.

अमरावती : आपल्या मित्रांसोबत नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना पूर्णानगरात घडली. अभिषेक श्‍यामराव तायडे (वय 18 रा. पूर्णानगर, आसेगाव) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या कुटुंबीयांचे परिसरात हॉटेल आहे. सकाळी काही वेळ येथे काम केल्यानंतर तो आपल्या गावातील तीन ते चार मित्रांसोबत आंघोळीसाठी पूर्णानदी पात्रात गेला होता. सर्वच मित्रांनी पाण्यात उड्या घेतल्या. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अभिषेक याने उडी घेताच गटांगळ्या खाल्ल्याने तो बुडाला. आरडाओरड झाल्यानंतर त्याला थोड्या दूर अंतरावरून पाण्याच्या बाहेर काढले. तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे इर्विनच्या डॉक्‍टरांनी तपासणीअंती जाहीर केले. आसेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. उत्तरीय तपासणीनंतर अभिषेकचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bathing boy drowns in a river