वाघिणीसोबतच्या झुंजीत अस्वल ठार

file photo
file photo

वर्धा : कारंजा (घाटगे)  तालुक्‍यातील वनविभागाच्या उमरी बीट कक्ष क्रमांक 191 मध्ये वाघिणीने बछड्यासोबत गाय व अस्वलाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून ती रविवारी (ता.15) उघडकीस आली.
कारंजा (घाटगे) तालुक्‍यात सध्या वाघिणीने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांच्या शिकारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.धामकुंड येथील विलास घंगाळ यांची गाय ठार केली. त्यानंतर अंबादास साठे यांच्या दोन गायी ठार केल्या. शनिवारी (ता. 15) लिंगामांडवी येथील राधेश्‍याम ढोबाळे यांची गाय वाघिणीने ठार केली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनअधिकारी पाहणी करण्यासाठी गेले असता त्याच ठिकाणी अस्वल मृतावस्थेत आढळले. घटनेची पाहणी केली असता वाघिणीसोबत तिचा बछडा असल्याने वाघिणीने पहिल्यांदा गाय ठार केली. त्यानंतर त्या ठिकाणी अस्वल आल्याने वाघिणीची अस्वलीसोबत झुंज झाल्याचे निदर्शनास येत आहे. या झुंजीत अस्वल ठार झाली असावी असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. अस्वल तीन वर्षे वयाचे असल्याचे सांगण्यात आले.
अस्वलीला ठार करण्याची पहिलीच घटना
वाघाने अस्वलीला ठार केल्याची ही घटना पहिली घटना आहे वाघिणीसोबत बछडा त्याच्या संरक्षणासाठी तिने अस्वलावर हल्ला केला. या झुंजीत अस्वलाचा मृत्यू झाला असावा.
आर.बी. गायनेर, वनपरिक्षेत्र अधिकरी कारंजा (घा).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com