अमरावतीत बार व्यवस्थापकास मारहाण; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

अमरावती : शहरातील रंगोली बारच्या व्यवस्थापकाला मारहाण करून रोकड लुटली. प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघेही चांदणी चौक व ताजनगर येथील रहिवासी आहेत.

अमरावती : शहरातील रंगोली बारच्या व्यवस्थापकाला मारहाण करून रोकड लुटली. प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी दोघांना अटक केली. दोघेही चांदणी चौक व ताजनगर येथील रहिवासी आहेत.
सय्यद अहमद सय्यद हसन व अ. शफिक अ. रफिक अशी अटक झालेल्या लुटारुंची नावे आहेत. रितेश पानसे हे रंगोली बारचे व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्ती बारमध्ये आल्या. दारू पिल्यानंतर त्यांनी पैसे देण्याच्या कारणावरूनन वेटर व व्यवस्थापकासोबत वाद घातला. त्यानंतर पानसे रात्री घराकडे जात असताना रेल्वेस्थानक ते रुक्‍मिणीनगर मार्गावर दोघांनी त्यांना अडविले व जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर खिशातील 1 हजार 900 रुपयांची रोख रक्कम हिसकावली. पानसे यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी लुटारुंविरुद्ध गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating the bar manager in Amravati; Both arrested

टॅग्स