गोंदियात "आयपीएल"वर चालला होता जुगार

SATTA
SATTA

गोंदिया : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर इंडियन या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यावर क्रिकेट माझा -११ या ऍपद्वारे जुगार खेळणाऱ्या चार जणांवर गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ४ लाख ३ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (ता.२८) रात्री दहाच्या सुमारास मच्छी मार्केट परिसरात करण्यात आली.

येथील मच्छी मार्केटजवळील कबाडी दुकानाच्या आतमध्ये एका बंद खोलीत मोबाईल फोनच्या साहाय्याने दुबई येथे सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लीग टी-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळला जात आहे. अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने मच्छी मार्केटजवळील कबाडीच्या दुकानात छापा टाकला. यावेळी सूजल राजेश चव्हाण (वय २०), सारंग मनुसिंग चव्हाण (वय २७), मयंक रामअवतार गुप्ता (वय २९) व किसनसिंग प्रदीपसिंग चव्हाण (वय २७) हे बंद खोलीत टीव्हीसमोर बसून मोबाईलवर ऑनलाइन सट्टा खेळताना आढळून आले.

यातील आरोपी सूजल चव्हाण याची चौकशी केली असता, त्याने क्रिकेट माझा-११ या ऍपवर क्रिकेट बेटींगबाबत आकडे पाहून अखिल, सॅन्टी, हीट व शिवम यांच्याकडून पैसे स्वीकारत सट्टा चालवित असल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींकडून ८ मोबाईल हॅण्डसेट्‌स, टीव्ही, सेटटॉप बॉक्‍स, दोन टीव्ही रिमोट, डायरी व तीन दुचाकी असा एकूण ४ लाख ३ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शास्त्री वॉर्डातही छापा
गोंदिया येथील शास्त्री वॉर्डातील योगेश उर्फ मामा बन्सोड हा स्वतःच्या घरी आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या घरी रात्री साडेदहाच्या सुमारास छापा टाकला. यावेळी मामा बन्सोड हा घराच्या हॉलमध्ये टीव्हीसमोर बसून ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळताना आढळून आला.

सविस्तर वाचा - चेतनने केला होता ‘जेल ब्रेक’चा प्लॅन, पोलिसांवर करणार होते गोळीबार

तो मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत होता. त्याची पोलिसांनी चौकशी केली असता, पुनीत पांडे नावाच्या क्रिकेट बुकीकडून विकत घेण्यात आलेल्या आयडीवरील पैशाच्या स्वरूपातील पॉइंटवर सट्टा खेळविला जात असल्याचे सांगितले. शिवाय विक्रम ठाकूर, अजय आर्या, मनीष मेश्राम, अंकित मेंढे, फिरोज तिगाला व इतर जणांना ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळवित आहे, असे सांगितले. त्याच्या ताब्यातून ७० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com