नागपूर: बी. एड्‌च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर: बी. एड्‌च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नागपूर : कौटूंबिक कलहाला कंटाळून नागपुरातील वसतीगृहात राहणाऱ्या एका बि.एड्‌च्या विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बाळू आडे (वय 23, रा सोजयगाव, ता. मानोरा, जि. यवतमाळ) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. 

बाळू आडे हा मूळचा यवतमाळचा असून शिक्षणासाठी तो गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात राहत होता. सध्या तो अंबाझरीमधील लॉ कॉलेज चौकात असलेल्या विधी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होता. गेल्या आठ दिवसांपासून तो तणावात राहत होता. त्याने मित्राला कौटूंबिक कलहाला कंटाळल्याचे सांगितले होते. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास रूम नं. 170 मध्ये विष प्राशन केले. दुपारी चार वाजताच्या सुमारास काही विद्यार्थी त्याच्या रूमकडे गेले. त्यांनी बाळूला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना काहीतरी गळबळ असल्याचा संशय आला. त्यांनी अन्य काही विद्यार्थ्यांना आवाज देऊन दरवाजा उघडला. त्यावेळी बाळू निपचित पडलेल्या अवस्थेत दिसला. अंबाझरी पोलिसांना बोलावून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न 
बाळू हा कौटूंबिक वादाला कंटाळा होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपूर्वीही त्याने खेडेगावी हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुटूंबीयांच्या प्रकार लक्षात येताच त्यांनी ताबडतोब रूग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा जीव वाचला होता. मात्र, त्याने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचा जीव गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com