"हनीबी'ला घर देता का घर!

file photo
file photo

नागपूर : शहरातील फुलबाजारात एक फेरफटका मारा. फुलांभोवती घोंगावणाऱ्या मधमाशा (हनीबी) दिसतील. शेतशिवार, वने व जंगलात असणाऱ्या त्यांच्या अधिवासावर वृक्षतोडीमुळे मोठे संकट आले आहे. विकासाच्या बेफाम वेगामुळे कॉंक्रीटची जंगले उभी राहत आहेत. परिणामी मधमाशांना नाइलाजाने आपली हक्काची जागा सोडून शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. राज्य सरकारने 33 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम आखला आहे. यामध्ये मधमाशा पसंत करीत असलेल्या वृक्षांचीही काही प्रमाणात जर लागवड झाली तर "घर देता का घर' असे म्हणत फिरण्याची वेळ मधमाशांवर येणार नाही हे नक्की.
बेसुमार वृक्षतोडीचा फटका मधमाशांनाही बसला आहे. रानातील फुलझाडांचीही संख्या कमी होत चालल्याने शहरातील फुलबाजाराकडे मधमाशांनी आपले लक्ष वळविले आहे. फुलबाजारात उपलब्ध असलेल्या फुलांमधील मकरंद चाखून सर्व आवश्‍यक घटकांनी उपयुक्त अशी मधनिर्मिती करण्यात त्या व्यस्त असतात. फुलाचे फळात रूपांतर होण्यासाठी मधमाशा आवश्‍यक असून मधमाशाशिवाय वनस्पती व मानवी जीवनही धोक्‍यात येऊ शकते. शहर परिसरात मधमाशांना मकरंद गोळा करण्यासाठी उपयुक्त असलेल्या कडुनिंब, कवठ, चिंच, नारळ, गुलमोहर, करंज, नीलगिरी, बेल, हिरडा, जांभूळ आदी वृक्षांची संख्या कमी आहे. त्यामुळे मधमाशांना त्यांच्या पिलांच्या संगोपनासाठी पुरेसे मकरंद आणि परागकण मिळत नाहीत. म्हणूनच त्या फुलबाजारांचा आधार घेतात. हारातील उमललेल्या फुलांमधील परागकण आणि मकरंद त्यांना सहज उपलब्ध होतो, असे तज्ज्ञ, जाणकारांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com