योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार : डॉ. अनिल बोंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी व कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम वरुड तालुक्‍यातील मुसळखेडा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचा जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. संत योगिराज महाराज, वरुडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे, डॉ.

अमरावती : शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे, असे आवाहन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी व कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम वरुड तालुक्‍यातील मुसळखेडा येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचा जिल्ह्यातील हा पहिलाच कार्यक्रम होता. संत योगिराज महाराज, वरुडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे, डॉ. वसुधा बोंडे, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी आदी उपस्थित होते.
ज्या मातीने मला पहिल्यांदा आमदार केले, तिचे पहिल्यांदा दर्शन घेणार हे ठरवले होते. त्यामुळे इथे पहिला कार्यक्रम घेतला, असे सांगून डॉ. बोंडे म्हणाले की, कृषिमंत्रीपदाच्या रूपाने मोठी जबाबदारी मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहे. राज्यात चांगले पर्जन्यमान होण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना आपण सर्व मिळून करूया, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले.
वाळलेल्या झाडांचे पंचनामे करा
जिल्ह्यात 68 हजार हेक्‍टर पैकी 14 हेक्‍टरील संत्राझाडे वाळली आहेत. त्यांचे तातडीने प्राथमिक सर्वेक्षण व पंचनामे करून घ्यावे, असे निर्देश डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Benefits of schemes will reach the last person: Dr. Anil Bonde