मिलिटरी क्षेत्रात शिरला बंगाली युवक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

नागपूर : सीताबर्डीतील 118 इन्फट्री बटालियन येथील प्रतिबंधित क्षेत्रात पश्‍चिम बंगाल येथील एक युवक शिरला. मिलिटरीच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. शामील सोरेन हर्रा सोरेन (40, रा. बिजलीवाडा, पो. स्टे. कुमारगंज, प. बंगाल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नागपूर : सीताबर्डीतील 118 इन्फट्री बटालियन येथील प्रतिबंधित क्षेत्रात पश्‍चिम बंगाल येथील एक युवक शिरला. मिलिटरीच्या जवानांनी त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. शामील सोरेन हर्रा सोरेन (40, रा. बिजलीवाडा, पो. स्टे. कुमारगंज, प. बंगाल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
सीताबर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामील सोरेन कामधंद्यासाठी नागपुरात आला होता. त्याची बहीण नागपुरात राहते. तो बहिणीकडे राहायचा. शुक्रवारी सायंकाळी तो कामधंद्यासाठी बहिणीच्या घरून बाहेर पडला. त्यानंतर त्याने कुठेतरी मनसोक्तपणे दारू ढोसली. रात्रीच्या वेळी तो गणेश टेकडी मंदिर परिसरात गेला. गणेश मंदिर टेकडी परिसराच्या मागील बाजूने तो 118 इन्फन्ट्री बटालियनच्या प्रतिबंधित क्षेत्रात शिरला. हा प्रकार गस्तीवर असलेल्या जवानांच्या लक्षात आला. रात्रीच्या अंधारात कुणीतरी प्रतिबंधीत क्षेत्रात घुसत असल्याचे पाहून जवान सतर्क झाले. जवानांनी त्याच्यावर बंदुका रोखून त्याला ताब्यात घेतले. जवानांनी त्याची विचारपूस केली असता त्याची भाषाला कुणाला समजत नव्हती. तो बंगालीमध्ये पश्‍चिम बंगाल येथे राहतो एवढेच तो सांगत होता. त्यावरून लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांचा संशय बळावला. त्याच रात्री शामीलला घेऊन जवान सीताबर्डी ठाण्यात आले. याप्रकरणी सुभेदार मालसिंग प्रल्हादसिंग शेखावत (44) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवून शामीलला अटक केली.
दुभाषकाची घेतली मदत
सोरेनची भाषा कुणालाही समजत नव्हती. त्यामुळे बंगाली भाषेच्या दुभाजकाला सीताबर्डी पोलिसांनी बोलावले. त्याची चौकशी केली असता त्याची बहीण नागपुरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याचा जावई आणि बहिणीला चौकशीसाठी बोलविण्यात आले. तसेच पोलिसांनी त्याच्या गावीदेखील चौकशी केली. चौकशीत त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समजले. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengali youth entered in military field