आयपीएलवर सट्टा उसळणार; पोलिसांसमोर आव्हान

crime
crime

अकोला : यंदा आयपीएल २०१९ च्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (ता.१२) होऊ घातला आहे. या दिवशी होणारा अंतिम सामना रंगणार आहे यात शंका नाही. यामुळे शहर परिसरातील सट्टा बाजारावरही परिणाम होणार आहे. या अंतिम सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा उसळणार असल्याचे संकेत असून, आता अंतिम सामन्यासाठी शहरातील सट्टाबहाद्दरांनी सट्ट्याचे दर ९७-९८ पैशांवर नेऊन पोहचविले आहेत. तुटपुंज्या पाच कारवायांवर समाधान मानलेल्या पोलिसांपुढे हे मोठे आव्हान असणार आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेसह प्रोबेशनल उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश देशमुख आणि खदान पोलिसांनी आयपीएलवर खायवडी करणाऱ्या सट्टा माफियांना अटक केली होती. मात्र, या कारवायानंतरही शहरातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत लोकसभा निवडणूक आणि आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टाबाजार सुरू आहे. तर रविवारी होऊ घातलेल्या अंतिम सामन्यासाठी या सट्टाबाजारात करोडोची उलाढाल होणार आहे. असे असले तरी मात्र, मागील काही दिवसांपासून शहरात पोलिसांनी एकही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. मात्र, अंतिम सामन्यांवर रंगणाऱ्या सट्ट्यावर तरी कारवाई होणार का? असा सवाल सुजाण नागरिकांकडून विचारल्या जात आहे. 

चांगभलं कोणाचं? 
दोन संघात सामना सुरू होण्याआधी वर्ल्ड वाईल्ड लाईनवर दर जाहीर केले जातात. यामध्ये दोन तुल्यबळ संघापैकी ज्या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत आणि तो संघ गुणांकामध्ये अव्वल आहे, अशा संघाचेच दर जाहीर करून सट्टा सुरू केला जातो. यामध्ये कमीत कमी हजार रुपयांपासून तर कोट्यवधी रुपयांची खायवडी केली जात आहे. तर आता अंतिम सामन्यासाठी शहरातील सट्टाबहाद्दरांनी सट्ट्याचे दर ९७-९८ पैशांवर नेऊन पोहचविले आहेत. तेव्हा जेवढी रक्कम सट्ट्यात लावली तेवढी रक्कम परत मिळते. यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. 

नेमकं पाणी मुरतेय कुठे? 
पोलिस दलातील विविध अधिकाऱ्यांनी शहर आणि परिसरात आयपीएल सट्ट्यावर छापामारी केली होती. या छापेमारीत खायवाडी करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह मोबाईल जप्त करण्यात आले होते. या मोबाईल फोनची तपासणी झाली की नाही, जर झाली असेल तर या सट्टाबाजारातील मुख्य सुत्रधारांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश का आले नाही असा सवाल यानिमित्ताने पुढे येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com