भय्यालाल भोतमांगे यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

भंडारा - खैरलांजी हत्याकांडातील पीडित भय्यालाल भोतमांगे यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी देऊळगाव येथे अंत्यविधी करण्यात आले. तत्पूर्वी भंडारा येथील डॉ. आंबेडकर स्मारक परिसर आणि म्हाडा वसाहतीतील निवासस्थानी हजारो समाजबांधवांनी अंत्यदर्शन घेतले.

येथील म्हाडा वसाहतीत राहणारे भय्यालाल भोतमांगे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी दुपारी भोतमांगे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेच उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने नागपूरला हलविण्यात आले. श्रीकृष्ण रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेबाराला त्यांचे पार्थिव येथे आणण्यात आले. त्रिमूर्ती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आले. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: bhaiyalal bhotmange last rites