Loksabha 2019: एक्झिट पोलनंतर संघाचे मोठे नेते गडकरींच्या भेटीला

 Loksabha 2019: एक्झिट पोलनंतर संघाचे मोठे नेते गडकरींच्या भेटीला

नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी हे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले आहेत.

भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय हे सुद्धा भय्याजी जोशी यांच्या सोबत नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

नागपूर येथिल गडकरींच्या निवासस्थानी ही भेट झाली असून या नेत्यांमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात इतर काही समीकरणं समोर येतात का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, विविध माध्यम संस्थांनी आणि सर्वेक्षण एजन्सीच्या मदतीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com