भंडारा-गोंदियातून 18 उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. वैध 24 उमेदवारांपैकी आज 6 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत केल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीत राष्ट्रीय व राज्याचे अधिकृत राजकीय पक्षाचे उमेदवार मधुकराव कुकडे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी), हेमंतकुमार पटले (भारतीय जनता पार्टी) आहेत. तसेच नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार अक्षय पांडे (विदर्भ माझा पार्टी), गोपाल उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), डॉ. चंद्रमणी कांबळे (डॉ. आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया), जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), धर्मराज भलावी (बहुजन मुक्ती पार्टी), नंदलाल काडगाये (बळिराजा पार्टी), राजेश बोरकर (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), मडावी कवडू (भारिप बहुजन महासंघ) यांचा समावेश आहे. तसेच अपक्ष उमेदवारांत अजाबलाल तुलाराम, किशोर पंचभाई, जगन गजबे, चनिराम मेश्राम, पुरुषोत्तम कांबळे, राकेश टेंभरे, रामविलास मस्करे व सुहास फुंडे हे रिंगणात आहेत.

Web Title: bhandar gondia loksabha byelection 18 candidate politics