जवाहरनगर : कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले हरिण.
जवाहरनगर : कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले हरिण.

भंडारा : मोकाट कुत्र्यांचा हरणावर हल्ला

जवाहरनगर (जि. भंडारा) : येथील आयुधनिर्माणी वसाहतीत मोकाट कुत्र्यांनी पाठलाग करून हरणाला गंभीर जखमी केले. मात्र, घटनेची वेळीच माहिती मिळाल्याने पिपल्स फॉर ऍनिमल संघटनेने वनविभागाच्या मदतीने हरणाला उपचारासाठी पशुवैद्यकीय चिकित्सालयात दाखल केले आहे.
जवाहरनगर आयुधनिर्माणीच्या परिसरात घनदाट जंगल आहे. आज सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाट चुकून वसाहतीत आलेल्या हरणाचा मोकाट कुत्र्यांनी पाठलाग सुरू केला. कुत्र्यांनी हरणाचे तोंड व पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले. त्यामुळे हरीण घाबरून इकडे तिकडे धावत होते. कुत्रे त्याला जखमी करत होते.
या घटनेची माहिती तेथील नागरिकांनी पिपल्स फॉर ऍनिमल संघटनेचे सचिन रंगारी यांना दिली. त्यांनी लगेच जवाहरनगर येथील वसाहतीत जाऊन या घटनेची माहिती जिल्हा वनाधिकारी यांना दिली. कार्यकर्त्यांच्या मदतीने हरणाची कुत्र्यांपासून सुटका केली. त्यानंतर आलेल्या वनविभागाच्या वाहनातून जखमी हरणाला उपचारासाठी पशुवैद्यकीय चिकित्सालयात पाठवण्यात आले. जखमी हरणावर उपचार केल्यानंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडण्यात येणार आहे.
वन्यप्राण्यांना रेबिजचा धोका
आयुधनिर्माणी वसाहतीत आतापर्यंत तीन ते चार वेळा मोकाट कुत्र्यांनी वन्यप्राण्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अन्य भागातही अशा घटना घडतात. यामुळे कुत्र्यांपासून वन्यप्राण्यांना रेबिज रोगाचे संक्रमण होण्याची भीती आहे. त्यानंतर जंगलातील वाघ व इतर मांसभक्षक प्राण्यांनासुद्धा रोगांचे संक्रमण होऊन मृत्यू होण्याचा धोका आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण व ऍन्टी रेबिज लसीकरण होणे आवश्‍यक आहे, असे पिपल्स फॉर ऍनिमलचे सचिन रंगारी यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com