उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज दिवस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 24 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, उद्या (ता. 14) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

भंडारा - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी 24 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले असून, उद्या (ता. 14) अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.

या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे मधुकर कुकडे, भाजपचे हेमंतकुमार पटले यांच्यासह 24 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. निवडणुकीत शिवसेना व बसपचा उमेदवार नसला, तरी विदर्भ माझा व भारिप-बहुजन महासंघाने उमेदवार दिल्याने चुरस वाढण्याची शक्‍यता आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची संधी असल्याने त्यानंतर उमेदवारांना निवडणुकीचे चिन्ह वाटपानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. 24 पैकी किती उमेदवार रिंगणात राहणार याबाबत मतदारांची उत्सुकता वाढलेली आहे.

Web Title: bhandara gondia loksabha constituency byelection candidate form politics