भंडारा: बोगस वैद्यकीय पदवीचे जाळे पवनीपर्यंत 

शाहिद अली
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

बोगस सर्टिफिकेटचा वापर करत वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या दोन डॉक्टर यांना
कणकवली पोलिसने बोगस सर्टिफिकेट रुग्णालयात ठेवून रुग्णसेवा करणार्‍या दोघांवर 14 जून पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता.

पवनी : (भंडारा) येथील अनेक वर्षांपासून हाजरा क्लिनिकच्या नावाखाली वैद्यकीय व्यसाय करणारे गोविंदकृष्ण सुखलाल हाजरा (वय 55) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील गोपाळ गुरुप्रसाद राय याला बोगस पदवी मिळून दिल्याने 31 जुलैला अटक करण्यात आली. या मुळे अनेकांना बोगस पदवी देण्याचे जाळे पवनीपर्यंत पसरले आहे.

बोगस सर्टिफिकेटचा वापर करत वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या दोन डॉक्टर यांना
कणकवली पोलिसने बोगस सर्टिफिकेट रुग्णालयात ठेवून रुग्णसेवा करणार्‍या दोघांवर 14 जून पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीधर जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिलीे. सुरेश गणपती शिंदे (धन्वंतरी क्लिनिक हुरमट तिठा) आणि गोपाळ गुरुप्रसाद राय (मुळव्याध दवाखाना, तेलीआळी-कणकवली) याला 16 जूनला डॉक्टरांना अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. यात राय यानी भंडारा ज़िल्ह्यातील पवनी येथील डॉ. गोविंदकृष्ण हाजरा यानी बोगस पदवी नागपुर येथून मिळवून दिल्याची कबुली केल्याने कणकवली पोलिसने तापासात गती दिली. याची माहिती हाजरा यांना होताच त्यांनी भंडारा न्यायालयामधून अग्रिम जामीन मिळविला. त्यानंतर हाज़रा यांना अग्रिम जामीन असून सुद्धा कणकवली येथे पोलिसांनी डॉ. गोविंदकृष्ण हाज़रा याला 31 जुलैला अटक करून न्यालय समक्ष हजर केले.

नागपूर येथील बोगस पदवी केंद्र येथे तपास करण्यात आले. हाज़रा यांना न्यायालयाने जामिनावर सोडले आहे. याच प्रकारे अनेक बोगस डॉक्टरचे जाळे जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे. पुढील तपास कणकवली पोलिस उपनिरीक्षक आरती पवार करीत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Bhandara news fake degree issue in pavni