कापणीयोग्य पीक पाण्याखाली आल्याने लाखोंचे नुकसान

शाहिद अली
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

पिकविमा मिळणार का? 
अचानकपणे निसर्गाने अवकृपा करीत सुसाटवा यासह जोरदार पाऊस झाला. परिसरातील हजारो हेक्टरमधील धानपिकाची नुकसान शक्य आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

पवनी (भंडारा): बळीराजाच्या कृपेने यंदा सुरवतीपासून शेतकरीं चांगल्या पिकाची अपेक्षा ठेवून होते  शेतकऱ्यांनी धानची रोवणी आटोपल्यानंतर ऐनवेळी वरूनराजाने दडी मारली. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे उभे पिक वाळु लागेले होते. परंतु मध्य वेळात पाऊस आल्याने धान पिकाला संजीवनी मिळाली होती. तर धानावरील लष्करी अळी पडली, उसनवार घेऊन किंवा व्याजाने औषधे घेऊन फवारणी केली. परंतु आता तो मेटाकुटीला आला आहे.

लष्कर अळी, डोक्यावर असणारा कजार्चा डोंगर, सततची नापिकी यासारख्या अनेक समस्यांनी शेतकरी माय-बाप हवालदिल झालेला होता परन्तु या वर्षी पिकाचे उत्पादन वाढेल या स्वपनत मगण होता.तर तालुक्यातील काही भागातील भूगभार्तील पाण्याची पातळी कमी झाल्याने शेतकरी यांच्या विहीरी कोरड्या पडल्या आहेत. अनेक प्रकारच्या उपाययोजना आखून धान पिक जोमात आले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने हजेरी लावली असून, कापनीसाठी आलेल्या धानाला या पावसाचा फटका बसला आहे. पवनी  तालुक्यातील अनेक गावांमधील शेतक-याच्या शेतातील कापनीसाठी आलेले उभे पिक जास्त पाण्यामुळे कुजले, तर काही ठिकाणी धानाच्या लोबाना अंकूर फुटले आहे. त्यामुळे हातात आलेले पिक, हातातून निसटून जाण्याच्या मार्गावर आहेत. 

जिल्ह्यातील ४० टक्के शेतकरी यांचे पिक कापणीला आली आहेत. गेल्या आठवड्या पासून लागून पडलेल्या पावसामुळे धानाची कापनी करू शकत नाही. पवनी तालुक्यातील इटगांव, सिंधपुरी, कोंडा, बामणी शेन्द्री भावड, मांगली कुर्जा, आसगाव परिसरातील शेतकऱ्याची धान पिके पाण्यामुळे कुजण्याच्या स्थितीत आहेत.

कडपाला सडका वास सुटला असून भुईसपाट धानसुद्धा सडण्याच्या मार्गावर असून साचलेले पाणी बांधणातून काढण्याचा प्रयत्न शेतकरी जीव ओतून करीत आहे. ही वास्तविकता हजारो हेक्टरात तालुक्यात  अनुभवायला मिळत आहे. हातातोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या दृष्टचक्रात सापडले असून शेतकरी पुरता हतबल झाला आहे. निसर्ग शेतक-यांच्या पाचविलाच पुजला असल्याने जगावे का मरावे अशी अवस्था झाली आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे असह्य होत आहे.

पिकविमा मिळणार का? 
अचानकपणे निसर्गाने अवकृपा करीत सुसाटवा यासह जोरदार पाऊस झाला. परिसरातील हजारो हेक्टरमधील धानपिकाची नुकसान शक्य आहे. नुकसानग्रस्त शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Web Title: Bhandara news rain in bhandara