भंडारा, यवतमाळात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

नागपूर - भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात "सकाळ माध्यम समूहा'च्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाची निवडणूक पार पडली, यासाठी झालेल्या मतदानाला तनिष्कांनी प्रचंड प्रतिसाद दिला. काही केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या. दोन्ही जिल्ह्यात एकूणच वातावरण तनिष्कामय झाले होते.

नागपूर - भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात "सकाळ माध्यम समूहा'च्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाची निवडणूक पार पडली, यासाठी झालेल्या मतदानाला तनिष्कांनी प्रचंड प्रतिसाद दिला. काही केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या. दोन्ही जिल्ह्यात एकूणच वातावरण तनिष्कामय झाले होते.

भंडारा जिल्ह्यात तनिष्का स्त्री प्रतिष्ठानच्या तनिष्का सदस्यांची निवडणूक उत्साहात पार पडली. यात जिल्ह्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानप्रक्रियेत सहभाग घेतला. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली, पवनी, लाखांदूर, बारव्हा या ठिकाणी सात केंद्रांवर आज मतदान घेण्यात आले. निवडणुकीत एकूण 12 महिला सदस्या उभ्या होत्या. या महिलांनी प्रत्यक्ष भेट, वॉट्‌सऍप, फेसबुक, पत्रक वाटून आपल्या उमेदवारीचा प्रचार केला. मोबाईलने मिसकॉल देऊनही आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करण्याची सोय असल्याने आज मोठ्या प्रमाणावर या पद्धतीने मतदान झाले. निवडणूक केंद्रावरही गृहिणी, नोकरवर्गातील महिला, महाविद्यालयीन युवती, शेतकाम करणाऱ्या महिला यांनी हजेरी लावून मतदान केले.

उद्या सकाळी दहाला सकाळच्या भंडारा विभागीय कार्यालयात मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत कोण विजयी होतो, याची उत्सुकता तनिष्का सदस्यांना लागली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. अनेकांनी मोबाईलवरून मतदान केले, हे विशेष.

यवतमाळ तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानाच्या मंत्रिमंडळ सदस्यांसाठी आज (शनिवारी) जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर 19 उमेदवारांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीला महिलांसह युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी आठपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. जिल्ह्यातील पुसद, उमरखेड, दारव्हा, नेर, यवतमाळ, बाभूळगाव व आर्णी आदी तालुक्‍यांतील नऊ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. यवतमाळ शहरातील तीन मतदान केंद्रांवर निवडणूक पार पडली. यावेळी मंत्री, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी मतदान केंद्रांना भेटी देऊन उमेदवारांना पाठबळ दिले. या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात तनिष्कांचा जागर झाला.

Web Title: Bhandara, yavatamalata spontaneous response to Vote