भरधाव वाहनाने बापलेकीला चिरडले

File photo
File photo

पाटणबोरी, झरी (यवतमाळ) : रुग्णालयात जाण्यासाठी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या वडिलांसह मुलीला भरधाव अनोळखी वाहनाने चिरडले. ही घटना सोमवारी (ता.16) पहाटे साडेपाचला पाटणबोरी राष्ट्रीय महामार्गावरील आदिशक्ती ढाब्यासमोर घडली.
मनोहर बळीराम दुधलकर (वय 50) व त्रिवेणी मनोहर दुधलकर (वय 22, दोघेही रा. पाटणबोरी) अशी मृतांची नावे आहेत. दुधलकर यांना सावंगी मेघे येथील दंत रुग्णालयात मुलीला घेऊन उपचारासाठी जायचे असल्याने पाच वाजताच घरून निघाले. बसस्थानकाजवळ बस मिळाली नाही. त्यामुळे ढाब्याजवलील पुलाजवळ गेले. तिथे डाव्या बाजूला उभे राहून नागपूर बसची प्रतीक्षा करीत होते. राष्ट्रीय महामार्गावर दोन चारचाकी ट्रक ओव्हर टेक करीत असताना दोघेही रस्त्याच्या बाजूला उभे होते.
दरम्यान, भरधाव वाहनाने दोघांनाही चिरडले. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मनोहर दुधलकर सुतार काम करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे पोलिस उपनिरीक्षक भोंगाळे, आउटपोस्टचे सुशील शर्मा, अफजल खान यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com