भरधाव पीकअप झाडावर आदळली

दोन गंभीर जखमी : तळणी फाट्याजवळील घटना
 pickup
pickupsakal

आसेगावपूर्णा : गुरुवारी पहाटेच्या सुमारास तुरीचे पोते भरून जात असलेली भरधाव पीकअप झाडावर आदळून पलटी झाली. या भीषण घटनेत वाहनचालक व अन्य एकजण गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी इर्विन रुग्णालयात हलवण्यात आले.

अमरावती-परतवाडा महामार्गावरील आसेगावपूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळणीपूर्णा फाट्यानजीक धारणी तालुक्यातून येणारे भरधाव बोलेरो पीकअप वाहन निंबाच्या झाडावर आदळून चालक व अन्य एक, असे एकूण दोन गंभीररीत्या जखमी झाले आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) पहाटे ५.३० च्या दरम्यान घडली.

 pickup
शासकीय निर्बंधांमुळे ‘शुभमंगल'' झाले शॉर्टकट

आसेगाव पोलिसांनी माहिती दिल्यानुसार बोलेरो पीकअप मालवाहू गाडी क्रमांक एमएच ३७ जे १३०७ वाहन चालक विनायक गोवर्धन पटवर्धन (रा. कारादा, ता. धारणी) तसेच जितेंद्र देवनारायण पांडे (रा. चाकरदा, ता. धारणी) हे धारणी येथून बोलेरो पीकअपने तुरीचे पोते घेऊन येत असताना तळणीफाटा नजीक अपघात झाला. सदर घटनेची माहिती आसेगावपूर्णाचे ठाणेदार किशोर तावडे यांना मिळताच त्यांनी सहकारी रूपेश तायडे व अनिल खांडेकर यांच्यासमवेत घटनास्थळ गाठले. वाहनाची धडक एवढी जबर होती की त्यातील चालक व त्याचा साथीदार त्या वाहनात अडकले होते. ठाणेदार तावडे व त्यांचे सहकारी व इतरांच्या मदतीने त्यांना वाहनातून कसेबसे बाहेर काढले व त्वरित अ‍ॅम्ब्युलन्सला बोलावून अमरावती येथे हलविण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास आसेगाव पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com