भारिप-बमसंची राज्य स्तरावर महिला संघटक समिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

भारिप-बमसंने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. कारेगाव भीमा प्रकरणानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर अॅड. बाळसाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व सर्व मान्य झाल्याने पक्षाने अकोला जिल्ह्याच्या सीमा अोलांडून राज्य स्तरावर पक्ष संघटना बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

अकोला : भारिप बहुजन महासंघाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता पक्षाच्या महिला आघाडीलाही प्रदेश स्तरावर नेतृत्व मिळाले आहे. पक्षाची राज्य महिला संघटन समितीची घोषणा रविवारी (ता.१३) बुलडाणा येथे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केली. अॅड. बाळासाहेब आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गर्दशनात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या अरुंधती सिरसाट, रेखा ठाकूर, डॉ. निशाताई शेंडे यांचा या समितीमध्ये समावेस करण्यात आला आहे. 

भारिप-बमसंने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. कारेगाव भीमा प्रकरणानंतर राज्य व राष्ट्रीय स्तरावर अॅड. बाळसाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व सर्व मान्य झाल्याने पक्षाने अकोला जिल्ह्याच्या सीमा अोलांडून राज्य स्तरावर पक्ष संघटना बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

राज्य कार्यकारिणीची धुरा बुलडाणा येथील भारिप-बमसंचे नेते अशोक सोनोने यांच्याकडे सोपविल्यानंतर आता महिला आघाडीही प्रदेश स्तरावर बळकट करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्यासाठी अकोला येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि भारिप-बमसंसाठी अनेक वर्षांपासून महिला आघाडीत काम करीत असलेल्या अरुंधती सिरसाट यांच्यासह रेखा ठाकूर, डॉ. निशाताई शेंडेकडे यांच्या समावेश असलेल्या राज्य महिला संघटक समितीची घोषणा प्रदेशाध्यक्षांनी केली. या समितीला प्रदेश स्तरावर पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच पक्षाच्या सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवून महिला आघाडीला बळकट करण्याच्या आव्हाणाचा सामना करावा लागणार आहे.  

Web Title: bharip bahujan mahasangh women organisation