‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ घोषणेनंतर आठवडाभरात अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

खामगाव : आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हयाची तातडीने अंमलबजावणी करीत नुकतेच राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतक-याकडून उपरोक्त योजनेतून लाभ घेण्यासाठी अर्ज मागविले आहे.

“स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी खर्चीले, त्यांचे कार्य अफाट आहे.  त्यांच्या निधनानंतर ‍ त्यांचे कार्य सदैव स्मरणात रहावे यासाठी राज्यातील फळ बागायतदार शेतकरी अधिकाधिक झपाट्याने विकसीत व्हावा, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळाने“भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय काही दिवसापुर्वीच घेतला आहे. या योजनेची जाहीरात आज प्रकाशीत करण्यात आली  या योजनेत फळबांगांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतक-याकडून  अर्ज मागविण्यात आले आहेत. खामगांव मतदार संघातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये आंबा, डाळींब, काजु, पेरू, सिताफळ, आवळा, चिंच, जांभुळ, कोकम, फणस,कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ या फळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात 6 हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे. ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’या नव्या योजनेमुळे स्व.भाऊसाहेबांच्या स्वप्नांप्रमाणे शेतकऱ्यांचा खरा विकास होऊन शेतकरी स्वावलंबी व्हावे यासाठी शेतक-यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे.
 
Web Title: bhausaheb fundkar falbag lagwad yojana implements in a week