शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा विजयी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मे 2019

यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवार भावना गवळी एक लाख 17 हजार 939 मतांनी विजयी झाल्या.  त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. 

विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाखे फोडून गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. या जल्लोषात जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. 
मतमोजणीच्या पहिल्या फेरी पासूनच भावना गवळी यांनी आघाडी घेतली. आजचा हा विजय कार्यकर्ते तसेच नेत्याच्या विश्वासचा विजय असून सर्वांनी प्रामाणिकपने काम केल्याने हे यश मिळाले अशी प्रक्रिया भावना गवळी यांनी व्यक्त केली. 

भावना गवळी यांना मंत्रिपदाची संधी

पहिल्या फेरी पासूनच ताई आघाडीवर राहिले असून मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पहिल्या फेरीपासून विद्यमान खासदार भावना गवळी या आघाडीवर राहिल्या स्वच्छ फेरीअखेर त्यांनी एक लाख 17 हजारांचे मतदान घेऊन त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे भावना गवळी यांनी पाचव्यांदा संसदेत प्रवेश केला असून एक प्रकारे यवतमाळ-वाशिम लोकसभेत निवडून यायची हॅट्रिक केली तर दोन वेळा वाशिम जिल्ह्यातून त्या खासदार म्हणून निवडून आल्या. 

त्यांच्या या विजयामुळे केंद्रात मंत्रिपदाची संधी त्यांना चालून आली आहे. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना आहे.

एकूण 30 फेरी पोस्टल बॅलेटसह

भावना गवळी-542098

काँगेस -माणिकराव ठाकरे 424159

वंचित बहुजन आघाडी- डॉ. प्रवीण पवार 94228

प्रहार जनशक्ति  वैशाली येड़े -20620

अपक्ष-पी. बी. आडे-24499

नोटा- 3966

117939 मतांनी भावना गवळी विजयी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhawana Gawali wins for 5th time in Yawatmal