पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी भूमिपूत्र आले धावून

मनोज भिवगडे 
शनिवार, 2 जून 2018

अकोला : भूजल पातळी खालावल्यामुळे नदी-नाल्यांसोबत विहिरी आणि बोअर आटल्या आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर तोडगा काढण्यासाठी खामगाव तालुक्यातील आणि बाळापूर तालुक्याच्या सीमेवरील पळशी बू येथील भूमिपूत्रांनी गाव शिवारातील नाल्याची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अकोला : भूजल पातळी खालावल्यामुळे नदी-नाल्यांसोबत विहिरी आणि बोअर आटल्या आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. यावर तोडगा काढण्यासाठी खामगाव तालुक्यातील आणि बाळापूर तालुक्याच्या सीमेवरील पळशी बू येथील भूमिपूत्रांनी गाव शिवारातील नाल्याची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

संत गाडगे बाबा पुरस्कार विजेते यशवंत ग्राम पळशी बु. बुलडाणा आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर आहे. चार-पाच वर्षांपूर्वी पाणीदार असलेल हे गाव आता दुष्काळाशी छायेत साडले आहे. या दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी गावकऱ्यांनी मिळून ‘वरुण जलसंचय योजना’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गावातून वाहणाऱ्या नाल्याची नांगरणी करण्याचा निर्णय घेतला. श्रमदानातून हे काम केले जाणार आहे. 

 

  • शहाद्यावरून घेतली प्रेरणी

शहादा तालुक्यातील गोमाई नदी डांबरखेडा गावातून मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. सन २००० मध्ये  डांबरखेडा परिसरात भूजलपातळी खालावली होती. या गावातील लोकांना चक्क नदी नांगरून भूजलातील पाणीपातळी ९० फुटावर आणली. हीच प्रेरणा घेत पळशीच्या भूमिपूत्रांनी गावातील नदी नांगरण्याचा निर्णय घेतला आहे. 

  • निधीसाठी आले भूमिपूत्र एकत्र

नाला नांगरणी करून गाव शिवारात पाणी जिरविण्यासाठी ट्रॅक्टर वापरले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या निधीची गरज भागविण्यासाठी नोकरी, कामधंद्याच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेल्या भूमिपूत्रांनी एकत्र येत आर्थिक मदतीसाठी हात पुढे केले आहे. या कामात गावकऱ्यांना मदत करण्यासाठी अशा भूमिपूत्रांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

गावकऱ्यांनी मिळून ‘वरुण जलसंचय योजना’ हा स्तुस्त उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निमित्त त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझ्यातर्फे खारीचा वाटा उचलून दिलेल्या खात्यावर रक्कम जमा केली आहे. माझ्यासारखाच वाटा इतर भूमिपूत्रांनी उचलावा, असे आवाहन मी करतो.                                           -प्रफुल्ल अशोक धनोकार, विमा सल्लागार, उदापूर, जुन्नर, पुणे

Web Title: Bhumiiputra came to fight for water problems