शिक्षणाधिकारी वंजारींचा मनमानी कारभार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नागपूर - सायकल खरेदी करणाऱ्या लाभार्थ्यांना डीबीटीची रक्कम 15 दिवसांत देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी दिले होते. मागील आर्थिक वर्षातील लाभार्थ्यांची यादी सरसकट मंजूर करून लाभ देण्याचा ठराव असल्यावरही तो अंमल करण्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी टाळाटाळ करीत असल्याचे गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. 

सभेत सदस्यांनी शिक्षण विभागाचे वाभाडे काढले. शिक्षण विभागात डीबीटीअंतर्गत विद्यार्थ्यांना सायकलीचा निधी दिला नाही. यावरून विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, चंद्रशेखर चिखले, शिवकुमार यादव, नंदा लोहबरे, शुभांगी गायधने यांनी शिक्षण अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. रिक्त पदांचा मुद्दाही अनेकांनी उपस्थित केला. 

नरखेड तालुक्‍यात शिक्षणाची दुरवस्था झाल्याचा आरोप नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे यांनी केला. नरखेड पंचायत समितीला गटशिक्षणधिकारी, शालेय पोषण आहाराचे पुरवठा अधिकारी, अधीक्षक हे पद रिक्त आहे. केंद्रप्रमुखाच्या 10 पैकी 9 जागा रिक्त आहेत. आरंभी, कामठी, रामपूर येथील शाळेत 7 वर्ग आहेत आणि दोनच शिक्षक कार्यरत आहेत. आरंभी येथील शाळेत राऊत नावाचे शिक्षक पाच वर्षांपासून जिल्हा परिषद मुख्यालयातील शिक्षण विभागात कार्यरत आहेत. अशीच अवस्था रामटेक पंचायत समितीची असल्याची ओरड जिल्हा परिषद सदस्य शांता कुमरे, दुर्गावती सरियाम आणि रामटेक पंचायत समिती सभापती किरण धुर्वे यांनी केली. 

नंदा नारनवरे यांनीसुद्धा शिक्षण विभागात रिक्त असलेल्या जागांसंदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले. आदिवासी भागातील रिक्त जागा त्वरित भरण्यात येतील, असे आश्‍वासन सीईओ संजय यादव यांनी दिले. सदस्यांना भेटण्यास ते वेळ देत नसून फोनही उचलत नाहीत. ते मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारी सदस्यांनी सभेत मांडल्या. तक्रारीनंतर सीईओ यादव यांनी वंजारी यांना सदस्यांसोबत चांगल्या वागणुकीची ताकीद दिली. 

वंजारींनी मागितली माफी 
काटोल तालुक्‍यातील अहमदनगर येथील शाळेच्या संदर्भात शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास मरकाम यांनी सभागृहात जाहीर नाराजी व्यक्त केली. मनोहर कुंभारे यांनी हा मुद्दा उचलून धरत वंजारी यांनी सभागृहात जाहीर माफी मागण्याची मागणी केली. चूक लक्षात येताच वंजारी यांना माफी मागितली.

Web Title: bicycle issue in nagpur zp