दारूड्या भावाने केली मोठ्या भावाची हत्या

file photo
file photo

चंद्रपूर : रात्रीच्या गाढ झोपेत असलेल्या मोठ्या भावाच्या डोक्‍यात वरवंटा घालून लहान भावाने त्याची हत्या केली. ही घटना येथील बगडखिडकी परिसरात मंगळवारी (ता. 20) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी भावास पोलिसांनी अटक केली. प्रभुदास मेश्राम, असे मृताचे, तर भास्कर मेश्राम असे आरोपीचे नाव आहे.
बगडखिडकी परिसरात एमईएलमधील सेवानिवृत्त कर्मचारी प्रभुदास मेश्राम हे कुटुंबीयांसह राहत होते. वृद्ध आई आणि दोन भाऊ हेसुद्धा त्यांच्याच घरी राहत होते. लहान भाऊ भास्करला दारूचे व्यसन होते. त्यामुळे मोठा भाऊ या नात्याने प्रभुदास हे भास्करला दारू सोडण्यासाठी आग्रह करीत होते. याच कारणातून या भावंडांत यापूर्वी अनेकदा वाद झाले होते.
सोमवारी रात्री जेवण करून प्रभुदास घरी झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या वादावर कायमचा पडदा टाकण्याच्या इराद्याने भास्करने मोठा भाऊ प्रेमदास याच्या डोक्‍यात वरवंटा घातला. यात प्रेमदास यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर भास्करने घटनास्थळावरून पळ काढला. मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. आरोपी भास्कर हा घटनेनंतर महाकाली कॉलरी परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर, रामनगरचे पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या नेतृत्त्वातील पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, राकेश निमगडे यांच्या पथकाने महाकाली कॉलरी परिसरातून भास्करला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com